Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अल्पवयीन मुलीच्या बलात्कारातील आरोपीला पीडितेच्या वडिलांनी घातल्या गोळ्या

Accused of raping a minor girl was shot by the victim's father अल्पवयीन मुलीच्या बलात्कारातील आरोपीला पीडितेच्या वडिलांनी घातल्या गोळ्याMarathi National News  In Webdunia Marathi
, शनिवार, 22 जानेवारी 2022 (10:33 IST)
उत्तर प्रदेशच्या गोरखपूरमध्ये अल्पवयीन बलात्कार पीडितेच्या पित्यानं दिवाणी न्यायालयाच्या आवारामध्येच आरोपीची गोळ्या घालून हत्या केल्याचा प्रकार घडला आहे.

दिलशाद हुसेन असं आरोपीचं नाव होतं. बलात्कार प्रकरणाच्या पहिल्याच सुनावणीला दिलशाद कोर्टाजवळ आला त्यावेळी त्याला पीडितेच्या वडिलांनी गोळ्या घातल्या
दिलशाद वकिलांना भेटण्यासाठी गेला असता त्याच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. त्या प्रकाराने कोर्टाच्या परिसरात खळबळ उडाली. गोळ्या झाडणाऱ्या पीडितेच्या वडिलांना पोलिसांनी अटक केली आहे.
 
30 वर्षीय दिलशादवर एका अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा आरोप होता. तो जामीनावर बाहेर होता. पहिल्याच हजेरीसाठी तो कोर्टात आला असता, पीडितेच्या वडिलांनी त्याच्यावर गोळ्या घातल्या.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

30 हजारांसाठी सावकारानं उचलून नेली दीड महिन्याची चिमुकली, 4 महिने स्वतःकडे ठेवलं बाळ