उत्तरप्रदेशातील आग्राच्या बॅंक मॅनेजर सचिन उपाध्याययांच्या हत्येच्या प्रकरणात वेगळे वळण लागले आहे. मयत सचिन यांच्या हत्येला 12 दिवस उलटले आहे. सचिनच्या पत्नी प्रियंकानेच त्याची हत्या केल्याचे उघडकीस झाले असून हत्येननंतर आरोपी पत्नीने घरकाम करणाऱ्या मोलकरणीला कढी भात आणि 16 पोळ्या बनवायला सांगितल्या. जेणे करून कोणाला संशय येऊ नये. अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. मयत सचिन उपाध्याय यांची हत्या 11 ऑक्टोबर रोजी रात्री झाली.
आरोपी पत्नी प्रियांकाने मयत सचिनचा मृतदेह खोलीत लपवून ठेवला. प्रियंकाने आपल्यावर कोणाला संशय येऊ नये या साठी तिने शेजाऱ्यांच्या मोबाईल वरून आपल्या वडिलांशी बोलणे केले. सध्या ती फरार आहे. 12 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 5 वाजता पोलिसांना सचिनने आत्महत्या केल्याचा फोन आला होता. पोलिसांना सचिनच्या मृतदेहावर जखमेच्या आणि भाजल्याच्या खुणा आढळल्या असून गळ्यावरही काही चिन्हे दिसत आहे. पोलिसांनी त्याचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले. शवविच्छेदनाच्या अहवालात हत्या केल्याचे समोर आले आहे.
आरोपी प्रियंकाने मृतदेह लपवण्यासाठी घटनास्थळावरील पुरावे नष्ट करून सचिनने आत्महत्या केल्याचा बनाव रचला. सचिनच्या मृतदेहावर गरम इस्त्रीचे चटके दिल्याचे तपासात समोर आले असून सचिनची हत्या ज्या खोलीत केली तिथे प्रियांकाने टाळा लावण्याचा आरोप सचिनच्या वडिलांनी केला असून सचिनच्या हत्येमध्ये सचिनच्या पत्नीचा भाऊ आणि सासऱ्यांच्या हात असल्याचे म्हटले आहे. तसेच सचिनच्या शवविच्छेदनाच्या अहवालाच्या निकालांनंतर देखील चार दिवसांनंतर पोलिसांनी हत्येची तक्रार नोंदवली असून पोलिसांच्या दुर्लक्षपणा मुळे प्रियांका फरार झाल्याचा आरोप सचिनच्या कुटुंबीयांनी केला आहे. सचिनची हत्या करून त्याचा मृतदेह 17 तास लपवून ठेवला परिसरातील सीसीटीव्ही केमेऱ्यांमुळे आरोपी प्रियंकाला मृतदेह विल्हेवाट लावता आला नाही.असा आरोप सचिनच्या कुटुंबीयांनी केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला असून पोलीस प्रकरणाचा तपास करत आहे.