Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

अफजल गुरुच्या मुलाला हवयं भारतीय पासपोर्ट

अफजल गुरुच्या मुलाला हवयं भारतीय पासपोर्ट
संसदेत झालेल्या हल्ल्याचा मास्टर माइंड अफजल गुरुच्या मुलाला आधार कार्ड मिळाल्याने गर्व होत आहे. अफजलला फाशी दिली गेली होती. 18 वर्षाच्या गालिबने म्हटले की आता त्याच्याकडे दाखवण्यासाठी किमान एक कार्ड तर आहे. तो खूप खूश आहे. गुलशनाबाद येथील पर्वतावर त्याचं घर असून तो आपल्या आई तबस्सुम आणि आजोबा गुलाम मोहम्मद यांसोबत राहत आहे.
 
गालिबचे म्हणणे आहे की आता त्याला भारतीय पासपोर्ट देखील मिळाला हवा ज्यामुळे मला भारतीय नागरिक असल्याचं गर्व होईल. अशाने परदेशात अभ्यासाला जाण्याचा मार्ग देखील मोकळा होईल. तो सध्या मेडिकलच्या नीट परीक्षेची तयारी करत आहे. त्याला भारताच्या मेडिकल कॉलेजमधून शिक्षण घेण्याची इच्छा आहे आणि शक्य असल्यास परदेशात जाऊन शिक्षण घेण्याची इच्छा त्याने दर्शवली आहे.
 
त्याने म्हटले की परीक्षेत यश मिळाल्यास परदेशात जाऊ इच्छित आहे. तुर्की कॉलेज मला स्कॉलरशिप देऊ शकतो. तो वडिलाचं स्वप्न पूर्ण करू पाहत आहे. त्याचे वडील आपलं मेडिकल करिअर बनवू शकले नव्हते.
 
गालिबने आपल्या आई श्रेय देत म्हटले की आईने त्याला दहशतवादी संघटनांपासून वाचवले जे त्याला भरती करू इच्छित होते. मी पाचवीत असतानाच आईने माझ्यासाठी वेगळी जागा तयार केली. तिने शिकवले की प्रतिक्रिया देऊ नकोस. माझी प्राथमिकता माझी आई आहे. गालिबची आई आणि आजोबा कश्मीर मुद्द्यात होणार्‍या वादात कधीच सहभागी झाले नाहीत.
 
गालिबने सांगितले की सुरक्षा दलांकडून त्याला कधीच शोषित केले गेले नाही. ते नेहमीच प्रोत्साहित करतात. ते म्हणतात की मेडिकलचा अभ्यास करू इच्छित असल्यास आम्ही कधीच अडवणार नाही. ते म्हणतात की मला आपल्या स्वप्नांवर विश्वास ठेवून डॉक्टर व्हायला हवं.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

रात्रभरात गायब झालं 100 वर्ष जुनं वडाचं झाड