अमित शाह यांचे पुत्र जय शाह यांच्या कंपनीचे प्रकरण चांगलेच तापले आहे. विरोधक जोरदार टीका करत आहेत.मात्र आता भाजपाध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर अमित शाह यांचे पुत्र जय शाह यांच्या कंपनीचा टर्नओव्हर 16 हजार पटींनी वाढल्याचं वृत्त दिले न्होटे. हे वृत्त ‘द वायर’ वेबसाईट ने दिले होते यामध्ये आता वेबसाईटच्या अडचणी वाढणार आहेत. या वेबसाईटने खोटं वृत्त दिल्याचा आरोप करत जय शाह यांनी द वायर विरोधात शंभर कोटींचा मानहानीचा दावा करणार असल्याचे पत्रकाद्वारे प्रसिद्ध केले आहे.
यामध्ये जय म्हणतात केई वेबसाईटने खोटी बातमी दिली आहे. हे माजी आणि वडिलांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला आहे. वडील अमित शाह यांच्या राजकीय वर्चस्वामुळे मला व्यवसायात यश मिळालं आहे हे असं दाखवले गेले आहे. मात्र हे साफ खोटे वृत्त आहे. मी माझा व्यवसाय करताना कायद्याचं पूर्णपणे पालन करतो आहे. उलट मी बँकेतून घेतलेलं कर्ज पूर्णपणे कायदेशीर आहे. दावा यांनी केला आहे.जय शाह यांच्यावर आरोप झाल्यानंतर रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी एका पत्रकार परिषदेत सर्व आरोप धुडकावून लावले.या मध्ये टेम्पल एन्टरप्रायझेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या व्यवहार चौकशी करावी अशी मागणी कॉंग्रेस आणि इतर विरोधी पक्ष करत आहेत.