Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Air India Plane Crash: एअर इंडियाच्या विमान अपघातात सर्व प्रवाशांचा मृत्यू

एअर इंडियाचे ७८७ ड्रीमलाइनर विमान अहमदाबादमध्ये कोसळले
, गुरूवार, 12 जून 2025 (18:36 IST)
एअर इंडियाचे ७८७ ड्रीमलाइनर विमान अहमदाबादमध्ये कोसळले. त्यात २४२ प्रवासी होते. ते लंडनला निघाले होते. असे सांगितले जात आहे की टेकऑफ केल्यानंतर स्फोट झाला तेव्हा ते विमानतळाची सीमा ओलांडूही शकले नाही. 
मिळालेल्या माहितीनुसार, एअर इंडियाच्या विमानातील कोणीही वाचले नाही. अहमदाबादच्या आयुक्तांनी माहिती दिली आहे की विमानातील सर्व २४२ जणांचा मृत्यू झाला आहे. अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात २४२ जण होते, ज्यात पायलट आणि क्रू मेंबर्सचा समावेश होता. यापैकी १६९ भारतीय नागरिक, ५३ ब्रिटिश नागरिक, १ कॅनेडियन नागरिक आणि ७ पोर्तुगीज नागरिक होते.

तसेच गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी देखील या विमानात होते. विमानतळ कॅम्पसला लागून असलेल्या एअर कस्टम कार्गो ऑफिसजवळ विमान कोसळले. विमान पडताच संपूर्ण परिसरात धुराचे लोट दिसले. अपघातानंतर, अहमदाबाद तसेच वडोदरा येथून अग्निशमन दलाच्या २५ गाड्या अहमदाबादला पाठवण्यात आल्या आहे. सुरतहून मदत आणि बचाव पथकेही अहमदाबादला पाठवण्यात आली आहे. आतापर्यंत विमानाच्या ढिगाऱ्यातून ५० मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. मदत आणि बचाव कर्मचारी आग विझवण्यासोबतच ढिगाऱ्यात अडकलेल्या जखमींचा आणि मृतांचा शोध घेत आहे.
 
तसेच एअर इंडियाच्या विमानातील सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला. विमानात बसलेल्या गुजरातच्या माजी मुख्यमंत्री यांचेही निधन झाले. भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि इतर नेत्यांनी अहमदाबाद विमान अपघातावर शोक व्यक्त केला आहे. तसेच ब्रिटिश पंतप्रधान स्टॉर्मर यांनी अहमदाबाद विमान अपघातावर शोक व्यक्त केला आहे.


Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

भारतीय रेल्वेने तात्काळ तिकिट बुकिंग सिस्टीममध्ये मोठा बदल जाहीर केला