लेह-लडाख आणि जम्मू-काश्मीरच्या सुरक्षेबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज अनुक्रमे दुपारी 3 आणि 4 वाजता महत्त्वाची बैठक बोलावली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. सीआरपीएफ, बीएसएफ, जम्मू-काश्मीरचे वरिष्ठ पोलीस अधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. याशिवाय आयबी आणि रॉ या गुप्तचर संस्थेच्या प्रमुखांचाही यात सहभाग असेल. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जम्मूच्या सिध्रा येथे बुधवारी दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये झालेल्या चकमकानंतर ही महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली आहे.
अमित शाह यांच्या या बैठकीत जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी कारवाया, ड्रोन कारवाया, टार्गेट किलिंग आणि काश्मिरी पंडितांवर होणारे हल्ले या मुद्द्यांवर चर्चा होऊ शकते. जम्मू शहराला लागून असलेल्या सिद्दा भागात बुधवारी पहाटे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत चार दहशतवादी ठार झाले आहेत. चार दहशतवाद्यांचे मृतदेह सापडले असून शस्त्रास्त्रेही सापडली आहेत. घटनास्थळी पोलीस, सीआरपीएफ आणि लष्कराचे पथक उपस्थित आहे. सध्या संबंधित परिसरात शोधमोहीम राबविण्यात येत आहे.