Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

दिल्ली हिंसाचार पूर्वनियोजित कटाचा भाग: सोनिया गांधी

Delhi Violence
, बुधवार, 26 फेब्रुवारी 2020 (13:50 IST)
दिल्लीत झालेल्या हिंसाचाराला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जबाबदारी स्वीकारुन तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केली आहे.
 
पत्रकार परिषदेत बोलताना दिल्लीत झालेला हिंसाचारात केंद्राने जाणीवपूर्वक 72 तासात कारवाई केली नाही असा आरोप देखील त्यांनी केला आहे. हे प्रकरण पूर्वनियोजित कटाचा भाग आहे. भाजपा नेत्यांच्या वायफळ आणि चिथावणीखोर वक्तव्यांमुळे हा हिंसाचार उफाळला असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तात्काळ अतिरिक्त सुरक्षा बंदोबस्त तैनात करण्याची मागणी सोनिया गांधी यांनी केली. या दरम्यान त्यांनी हे प्रश्न मांडले-
 
हे सर्व घडत असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल कुठे होते ?
यावर केंद्राने 72 तासात जाणीवपूर्वक कारवाई केली नाही ?
हिंसाचार वाढल्यानंतर निमलष्करी दलांना का पाचारण केले नाही ?
 
सोनिया गांधी यांनी दिल्लीच्या जनतेला शांती राखावी अशी अपील केली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सचिन केवळ क्रिकेट खेळण्यासाठीच जन्माला आला, इंझमामने केलं भरभरुन कौतुक