Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राणे - अमित शहा भेट राजकीय हालचालींना वेग

Webdunia
गुरूवार, 13 एप्रिल 2017 (12:44 IST)
सध्या कॉंग्रेस मध्ये नाराज असलेले कोकणाचे  नेते माजी मंत्री  नारायण राणे यांनी अहमदाबाद येथे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांची भेट घेतली आहे.  तर या भेटीचे विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्यांची भेट झाली आहे.  तर दुसरीकडे नारायण राणे यांचे सुपुत्र नितेश राणे यांनी नारायण राणे हे कोणताही निर्णय घेऊ शकतात असे वक्तव्य केले आहे त्यामुळे मोठा निर्णय होतो का असा प्रश्न निर्माण झाला आहे. तर काही दिवसा पूर्वी नितीन गडकरी शिवसेनेतून काँग्रेस मध्ये गेले ही चूक होती असे वक्तव्य केले होते.
 
नारायण राणे हे कॉंग्रेस पक्षावर नाराज असल्याच्या बातम्या समोर आल्या तर राणे आयांनी अनेकदा टीका केली आहे. नारायण राणे यांनी अहमदाबाद येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अमित शाह यांची भेट घेतल्याचे सांगितले जात आहे. राणे भाजपमध्ये प्रवेश करणार का ही चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

मतदार ओळखपत्र असं काढतात, त्यासाठी ऑनलाईन अर्ज असा करा

नीता अंबानींचा लेकीसोबत घर मोरे परदेसिया' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल!

गोड पदार्थ सारखे सारखे का खावे वाटतात? त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी करा या 10 गोष्टी

RBI guidelines change क्रेडिट कार्ड जारी करण्याच्या नियमांमध्ये कोणते बदल? जाणून घ्या

आता आधार कार्ड या तारखे पूर्वी अपडेट करा

पुढील लेख
Show comments