विमानाच्या हायड्रोलिक सिस्टममध्ये बिघाड झाल्याने विमानाला विमानतळावर उतरण्यास अडचण आली. यामुळे विमान हवेत फिरत राहिले. मिळालेल्या माहितीनुसार तामिळनाडूच्या त्रिचीहून शारजाहला जाणाऱ्या एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानात तांत्रिक बिघाड झाला त्यामुळे विमानाला विमानतळावर उतरवण्यात अडचण आली. सुमारे अडीच तास विमान हवेत घिरट्या घालत राहिले. बऱ्याच प्रयत्नांनंतर विमान सुखरूप उतरले.
तसेच एअर इंडिया एक्स्प्रेसचे फ्लाइट AXB613 140 प्रवाशांना घेऊन त्रिचीहून शारजाहसाठी निघाले होते. विमान धावपट्टीवरून हवेत पोहोचताच त्याची हायड्रोलिक यंत्रणा बिघडली. यानंतर पायलटने आपत्कालीन स्थिती घोषित करून विमानतळ व्यवस्थापनाला माहिती दिली. तसेच विमानाला लँडिंगमध्ये अडचण येत असल्याचे विमानतळ व्यवस्थापनाने सांगितले. इंधन कमी करण्यासाठी विमान हवेत उडवण्यात आले. तसेच सुमारे अडीच तास विमान हवेत घिरट्या घालत राहिले. त्रिची विमानतळाजवळ प्रदीर्घ विलंबामुळे 140 प्रवाशांचा जीव अडकला होता. तसेच आपत्कालीन परिस्थिती पाहता विमानतळावर रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. मोठ्या प्रयत्नानंतर विमान त्रिची विमानतळावर सुखरूप उतरले आहे. व विमान सुखरूप उतरल्यानंतर प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
Edited By- Dhanashri Naik