Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आईस्क्रीम कारखान्यातील कामगारांना चोरीच्या संशयावरून मालकाने दिली भयंकर शिक्षा

Webdunia
शनिवार, 19 एप्रिल 2025 (16:43 IST)
Chhattisgarh News: छत्तीसगड मधील कोरबा जिल्ह्यात धक्कदायक बातमी समोर आली आहे. आईस्क्रीम कारखान्याच्या मालकाला दोन्ही कामगारांवर चोरीचा संशय होता. या कारणास्तव त्यांना अमानुष वागणूक देण्यात आली. कपडे काढून त्यांना विजेचा झटका देण्यात आला आणि त्याचे नखे उपटण्यात आले.
ALSO READ: ठाणे कारागृहात २२ वर्षीय कैद्याचा मृत्यू;
मिळालेल्या माहितनुसार छत्तीसगडमधील कोरबा जिल्ह्यात एका मालकाने त्याच्या दोन कामगारांचे नखे उपटले आणि त्यांना विजेचा धक्का देऊन  शिक्षा दिली. मालकाला या कामगारांवर चोरीचा संशय होता आणि त्यासाठीच त्यांना शिक्षा देण्यात आली. शनिवारी एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, ही घटना सिव्हिल लाइन्स पोलिस स्टेशन परिसरात घडली. राजस्थानमधील भिलवाडा जिल्ह्यातील दोन कामगार हे आईस्क्रीम कारखान्यात काम करायचे. मालकाने दोन्ही कामगारांवर चोरीचा आरोप केला आणि त्यांचे कपडे काढले. यानंतर, दोघांनाही विजेचे झटके देण्यात आले आणि त्यांची नखे उपटण्यात आली. पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका अर्धनग्न पुरूषाला विजेचे झटके देताना आणि मारहाण करताना दिसत आहे. घटनेनंतर, दोन्ही पीडित पळून गेले आणि भिलवाडा येथे पोहोचले. त्यांनी भिलवाडा येथील गुलाबपुरा पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.  
 
पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर शुक्रवारी कोरबा येथील सिव्हिल लाईन्स पोलिस ठाण्यात मालकाविरुद्ध  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  
ALSO READ: मुंबई : बाल तस्करी प्रकरणात महिला डॉक्टरला अटक
Edited By- Dhanashri Naik 
ALSO READ: मुलाच्या अस्थी विसर्जनासाठी प्रयागराजला जात होते कुटुंब, भीषण अपघातात चौघांचा मृत्यू

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

पुढील लेख
Show comments