Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

केंद्रीय मंत्री अनंतकुमार यांचे कर्करोगामुळे निधन

anand kumar
, सोमवार, 12 नोव्हेंबर 2018 (14:14 IST)
केंद्रीय रासायनिक आणि संसदीय कामकाज मंत्री अनंतकुमार (५९) यांचे रविवारी मध्यरात्री दीड वाजता कर्करोगाच्या आजाराने निधन झाले. बेंगळूरू येथील आपल्या निवासस्थानी त्यांची प्राणज्योत मालवली. बंगळुरुतील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. नुकतेच लंडन दौऱ्यावरुन घरी परतले होते. दक्षिण बेंगळूरू मतदारसंघातून ते सहा वेळा निवडून आले आहेत.  
 
पंतप्रधान मोदी शोक व्यक्त करताना म्हणाले की, अनंत कुमार हे एक अतिशय चांगले नेते होते. त्यांनी आपल्या युवा काळात राजकारणात प्रवेश केला. त्यांनी संपूर्ण निष्ठेने समाजाची सेवा केली. त्यांच्या चांगल्या कामांसाठी ते नेहमीच स्मरणात राहतील. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सामील आहोत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आता मॅन्युअली एका क्लिकवर फोनचा बॅकअप घ्या