Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

रेणू शर्माचा आणखी एक कारनामा उघड, रिझवान कुरेशी नामक तरुणाला देखील छळले

Another of Renu Sharma's exploits revealed
, शुक्रवार, 15 जानेवारी 2021 (09:42 IST)
सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप केलेल्या रेणू शर्मा नामक महिलेवर भाजपचे माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी हनी ट्रॅप मध्ये अडकवल्याची तक्रार पोलिसात दिली आहे. याच महिलेकडून असाच प्रयत्न मनसे नेते मनीष धुरी यांच्यासोबत देखील घडला असल्याचे उघड झाले. हे प्रकरण ताजे असतानाच आता रेणू शर्माचा आणखी एक कारनामा उघड झाला आहे. रेणू शर्मा हिने जेट एअरवेज कंपनीत अधिकारी असलेल्या रिझवान कुरेशी नामक तरुणाला देखील असेच छळले होते हे पोलिसात दिलेल्या कागदपत्रांपैकी काही हाती लागलेल्या कागदपत्रांवरून समजते आहे.
 
सोशल मिडीयावरून ओळख झाली, त्यानंतर मैत्री, त्यानंतर भेटीगाठी, हॉटेलिंग आणि बरेच काही घडले. हे जवळपास दोन वर्ष चालले त्यानंतर मात्र या महिलेने रिझवान कुरेशी विरोधात याच आंबोली पोलीस ठाण्यात विनयभंगाची आणि बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार दाखल केली.
 
याप्रकरणी अधिक माहिती घेतली असता, रिझवान कुरेशी या जेट एअरवेज कंपनी मधील एका अधिकाऱ्याच्या रेणू शर्मा सोशल मीडियाच्या माध्यमातून मे २०१८ मध्ये संपर्कात आली. त्यानंतर त्यांच्यात मैत्री, हॉटेलिंग आणि बरेच काही घडले. पण जुलै २०१९ अखेर याच रिझवान विरुद्ध रेणू शर्मा हिने पोलिसात विनयभंग आणि बलात्काराचा प्रयत्न केल्याची तक्रार दाखल केली होती.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Whatsapp सुटलं तर या 4 मेसेजिंग अॅप्सपैकी कोणतेही निवडू शकता