Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

'मैं अरविंद केजरीवाल शपथ लेता हूँ', असे म्हणत घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ

Arvind Kejriwal
, रविवार, 16 फेब्रुवारी 2020 (12:28 IST)
उपराज्यपाल अनिल बैजल यांच्या उपस्थितीत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सलग तिस-यांदा दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
 
 भाजप आणि काँग्रेसचा दिल्लीत सुपडा साफ करून अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाने बहुमताने दिल्लीत सत्ता स्थापन केली आहे. अरविंद केजरीवाल यांच्यासोबत ६ मंत्र्यांचा शपथविधी सोहला दिल्लीच्या रामलीला मैदानात आयोजित करण्यात आला आहे.
 
शपथविधीचा हा सोहळा अनेक अर्थांनी विशेष असणार आहे. या सोहळ्यासाठी दिल्लीतील सर्वच लोकांना आमंत्रित करण्यात आले. विशेष म्हणजे शपथविधीच्या मंचावर दिल्लीच्या विकासात योगदान देणारे ५० विशेष पाहुणे उपस्थित आहेत. यात डॉक्टर्स, शिक्षक, बाइक रायडर्स, एम्ब्युलन्स चालक, सफाई कर्मचारी, बांधकाम कामगार, बस मार्शल, ऑटो ड्रायव्हर अशा लोकांचा समावेश आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक!