Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Baby Care Fire: बेबी केअर आग प्रकरणाच्या आरोपींना 5 दिवसांची पोलीस कोठडी

Webdunia
सोमवार, 27 मे 2024 (21:24 IST)
दिल्लीतील विवेक बिहार येथील बेबी केअर सेंटर आग प्रकरणातील दोन्ही आरोपींना न्यायालयाने पाच दिवसांची कोठडी सुनावली आहे. या आगीत सात मुलांचा मृत्यू झाला होता. अटक करण्यात आलेले दोन्ही आरोपी डॉक्टर आहेत. न्यायालयाने आरोपींना   30 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
 
तपासादरम्यान टीमने हॉस्पिटलचा परवाना तपासला असता तो कालबाह्य झाल्याचे आढळून आले. याशिवाय दिल्ली सरकारच्या डीजीएचएस विभागाने या रुग्णालयाला केवळ पाच खाटांचे रुग्णालय चालवण्याची परवानगी दिली होती. त्याचे उल्लंघन करून 12 खाटांचे रुग्णालय चालवले जात आहे.
 
तपासणीत असे आढळून आले की हॉस्पिटलची एनओसी 31 मार्च रोजी संपली होती आणि हॉस्पिटलला पाच बेडची परवानगी होती परंतु त्यांनी 10 पेक्षा जास्त बेड्स बसवल्या होत्या. याशिवाय आपत्कालीन परिस्थितीत बाहेर पडण्यासाठी अग्निशमन यंत्रणाही नव्हती. त्यामुळे एफआयआरमध्ये आयपीसीची कलम 304 आणि 308 जोडण्यात आली आहे. या अग्निकांडात 7 निष्पाप नवजात मुलांचा होरपळून दुर्देवी मृत्यू झाला.

Edited by - Priya Dixit 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पितृ पक्ष 2024: पितृपक्षात श्राद्ध, तर्पण किंवा पिंडदान करण्यासाठी लागणारे साहित्य आणि पूजा विधी जाणून घ्या

पितृपक्षात मृत नातेवाईक स्वप्नांच्या माध्यमातून संदेश देतात, अशी स्वप्ने पडली तर दुर्लक्ष करू नका

लाल रंग सकारात्मक की नकारात्मक? आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व जाणून घ्या

अविवाहित आणि आकस्मिक मृत्यू झालेल्या पूर्वजांसाठी तर्पणचे नियम जाणून घ्या

Vastu Tips: तुमचे भाग्य बदलू शकतात वास्तुशास्त्राचे हे 5 उपाय

पुढील लेख
Show comments