Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Friday, 23 May 2025
webdunia

सरफराज-तालिब एनकाउंटर: बहराइच हिंसाचार प्रकरणातील आरोपी नेपाळला पळून जाण्याच्या प्रयत्नात होते

Bahraich Violence case Accused Encounter
, गुरूवार, 17 ऑक्टोबर 2024 (15:40 IST)
उत्तर प्रदेशातील बहराईचमध्ये प्रतिमा विसर्जनाच्या वेळी दोन समुदाय आमनेसामने आले. पोलिसांनी या प्रकरणातील मुख्य आरोपी सर्फराज आणि तालिबचा एनकाउंटर केला. हे दोन्ही आरोपी नेपाळला पळून जाण्याच्या बेतात होते. या घटनेनंतर पोलीस या आरोपींचा सातत्याने शोध घेत होते.
 
बहराइच हिंसाचारात मारले गेलेले राम गोपाल मिश्रा यांच्या हत्येत सरफराज आणि तालिबचा हात असल्याचे सांगण्यात येत आहे. या दोघांनी आपल्या मित्रांसह राम गोपाल यांच्यावर गोळीबार केला होता. दोन्ही आरोपींच्या लोकेशनचा पोलिस सातत्याने माग काढत होते. दरम्यान, पोलिसांनी दोन्ही आरोपींना एन्काउंटर केले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024: मनोज जरांगे पाटील फॅक्टर किती परिणामकारक ठरणार?