मध्य प्रदेशातील भोपाळमधील एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. काही लोक एका तरुणाला बंधक बनवून त्याच्यासोबत वाईट वर्तन करत असल्याचे या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे. या व्हिडिओमुळे राजकीय वर्तुळातही खळबळ उडाली आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की काही लोकांनी एका तरुणाला पट्ट्याने बांधले आहे आणि त्याला माफी मागण्यास सांगत आहेत. तसेच त्यांचे म्हणणे न ऐकल्यास बहीण व आईसोबत वाईट करण्याची धमकी देत आहे.
हा व्हिडिओ टिळाजमालपुरा पोलीस ठाण्या परिसरातील आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये हा तरुण विनवणी करताना दिसत असून तो सतत सर्वांची माफी मागत आहे. या व्हिडीओमध्ये तरुणावर धर्मांतरासाठी दबाव टाकला जात असल्याचेही दिसत आहे. तरुणाला अशी वागणूक का देण्यात आली याचा उलगडा अद्याप झालेला नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, हा तरुण इंद्र विहार कॉलनी येथील रहिवासी असून तो फोटोग्राफर म्हणून काम करतो. हा व्हिडीओ 9 जून रोजी तिलाजामलपुरा येथे बनवण्यात आल्याचे त्याच्या मित्रांचे म्हणणे आहे. याबाबत तक्रारही करण्यात आली होती, मात्र पोलिसांनी त्यावर कोणतीही कारवाई केली नाही.
या तरुणाला एवढी वाईट वागणूक का दिली जात आहे, हे व्हिडिओ पाहून समजू शकत नाही. सध्या पोलिसांनी सहा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मात्र, याप्रकरणी अद्याप कोणतेही वक्तव्य करण्यात आलेले नाही. या व्हिडिओमागील सत्य जाणून घेण्यासाठी पोलीस या प्रकरणाचा बारकाईने तपास करत आहेत. तसेच व्हिडीओ बनवण्यामागे कोण-कोण सहभागी होते, याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहे.