Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Bihar :बोटीवर अन्न शिजवताना सिलेंडरचा स्फोट, पाच मजुरांचा मृत्यू

Cylinder explosion while cooking food on boat
, शनिवार, 6 ऑगस्ट 2022 (20:23 IST)
बिहारमधील पटना येथील मणेर येथे शनिवारी एक मोठी दुर्घटना घडली. येथे सोन नदीत बोटीवर स्वयंपाक करत असताना गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. या भीषण अपघातात पाच मजुरांचा मृत्यू झाला. बोट वाळूने भरलेली होती. सध्या पोलिसांनी सर्व मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे. बोटीवरील लोक हल्दी छपरा गावातील असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी सांगितले की, पाचही मजुरांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात इतका भीषण होता की बोटीचा चक्काचूर झाला. 
 
रामपूर दियारा घाटाजवळ हा अपघात झाला. यामध्ये अनेक जण जखमी झाल्याचेही सांगण्यात येत आहे. सिलिंडरच्या स्फोटानंतर आजूबाजूच्या परिसरात गोंधळाचे वातावरण आहे. पोलिसांनी पाचही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. बोटीवरील सिलिंडरचा स्फोट झाल्यामुळे हा अपघात झाल्याचे प्रथमदर्शनी समोर आल्याचे पोलिस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे, मात्र तसे नाही. डिझेलच्या डब्याजवळ मजूर स्वयंपाक करत होते. त्यामुळे हा अपघात झाला. ते म्हणाले, कामगारांची अद्याप ओळख पटलेली नाही.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कॉमनवेल्थ गेम्स : बीडच्या अविनाश साबळेनं रचला इतिहास, स्टीपलचेस शर्यतीत रौप पदकाची कमाई