Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नवरदेव मंडपाऐवजी थेट क्वारंटाइन सेंटरमध्ये

Bihar groom quarantine after corona positive report
, शनिवार, 27 जून 2020 (10:58 IST)
सरकारने लग्न कार्यास परवानगी ‍दिल्याने अनेक जागी अटींचे पालन करुन विवाह संपन्न केले जात आहे. तरी खळबळजनक घटना म्हणजे नवरदेवालाच कोरोना निघाला आणि लग्न सात फेरे घेण्याआधीच त्याला क्वारंटाई सेंटरमध्ये भरती करावे लागले.
 
बिहारच्या रायपूर इथल्या 28 वर्षीय तरुणाचं शुक्रवारी लग्न होणार होतं. लग्नाची वरात घेऊन सासरी जाण्याची तयारी सुरू असताना कोरोना पॉझिटिव्ह असल्यामुळे नवरदेवाला मंडापाऐवजी सरळ क्वारंटाईन सेंटर गाठावं लागलं. 
 
हा तरुण मुंबईतील एका कारखान्यात काम करत होता. लॉकडाऊनच्या काळात काम गेल्यानं बेरोजगार तरूण आपल्या गावी परतला होता. तो 4 दिवस क्वारंटाइन सेंटरमधून घरी देखील आला. त्यावेळी कुटुंबियांनी त्याचा विवाह करण्याचे निश्चित केले पण बाहेरुन गावात येणाऱ्या लोकांची प्रशासनाकडून कोरोना चाचणी करण्यात आली होती. या चाचणीनंतर हा नवरदेव कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानं त्याला रुग्णालयात भरती करण्यात आलं. 
 
नवरदेव कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानं क्षेत्रात खळखळ उडाली आणि घटनेची माहिती वधू पक्षाला देखील देण्यात आली. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी युसूफ मेमनचा कारागृहात मृत्यू