बिहारमध्ये, ज्या मुलीच्या कुटुंबीयांनी तिला मृत मानून तिच्यावर अंत्यसंस्कार केले, ती जिवंत असून तिने.स्वतःच्या फोन नंबरवरून व्हॉट्सअॅपवर व्हिडिओ कॉल केल्याची घटना घडली आहे. व्हिडीओ कॉल केल्यामुळे कुटुंबीयांमध्ये गोंधळाचे वातावरण होते. ज्याच्यावर अंत्यसंस्कार करून घरी परतले, ती व्यक्ती अचानक जिवंत झाली आणि फोन करू लागली यावर त्याचा विश्वासच बसत नव्हता. वास्तविक हे संपूर्ण प्रकरण पोलिस आणि कुटुंबीयांच्या निष्काळजीपणाचे आहे.
वास्तविक पोलिसांना एक बेवारस मृतदेह सापडला होता. पोलिसांनी मृतदेहाची चौकशी करण्यास सांगितले तेव्हा एका व्यक्तीने हा मृतदेह आपल्या मुलीचा असल्याचे सांगितले. पोलिसांनी नकळत मृतदेह ताब्यात दिला आणि कुटुंबीयांनी मुलीचा चेहरा देखील बघितला नाही आणि तिच्यावर अंत्यसंस्कार केले. आश्चर्यकारक बाब म्हणजे ज्या मुलीवर अंत्यसंस्कार झाले, तिचा स्वतःचा फोन आला. हे कस शक्य आहे, बघून त्यांना प्रथम धक्काच बसला.
हे प्रकरण आहे बिहारच्या पूर्णिया जिल्ह्यातील वाणीपूर पोलीस स्टेशन हद्दीतील अकबरपूरच्या दधवा गावात मंगळवारी एका मुलीचा मृतदेह आढळून आला. बिशनपूर गावातील रहिवासी विनोद मंडल यांनी हा मृतदेह त्यांच्या मुलीचा असल्याचे सांगितले होते. शवविच्छेदनानंतर त्यांनी अंत्यसंस्कारही केले. ज्या मुलीच्या मृतदेहावर त्यांनी स्वतःची मुलगी समजून शुक्रवारी अंत्यसंस्कार केले, त्या मुलीने व्हिडिओ कॉल केला.आणि ती जिवंत असल्याचे सांगितले. हे कसे घडले याचे घरातील सदस्यांनाही आश्चर्य वाटले.
कुटुंबीयांचे म्हणणे आहे की, त्यांची मुलगी प्रियकरासह पळून गेली होती. तिचा म मृत्यू झाल्याची शक्यता नातेवाईकांनी केली. त्याच मुलीने जेव्हा ती जिवंत असल्याची माहिती कुटुंबीयांना दिली तेव्हा लोकांना आश्चर्य वाटले. आता पोलिस प्रकरणाचा शोध लावत आहे.