Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

दिल्लीकरांची पसंती पीएमना; आप म्हणते इव्हीएममध्ये घोळ

bjp in delhi
, गुरूवार, 27 एप्रिल 2017 (09:32 IST)
दिल्ली एमसीडीच्या (Delhi MCD)निवडणूक निकालांमध्ये भारतीय जनता पार्टीला मोठा विजय मिळत आहे.
 
त्या पार्श्वभूमीवर स्वराज इंडियाचे संस्थापक योगेंद्र यादव म्हणाले की दिल्लीकरांनी पीएमना अर्थातच पंतप्रधान
नरेंद्र मोदींना निवडले आहे, तर सीएम अरविंद केजरीवाल यांना नाकारले आहे. एका वृत्त वाहिनीशी ते बोलत होते.
 
ते पुढे म्हणाले की अरविंद केजरीवाल यांच्याप्रती दिल्लीकरांनी रोष व्यक्त केला असल्याचा हा परिणाम आहे.
 
योगेंद्र यादव यापूर्वी आम आदमी पार्टीत होते, मात्र केजरीवाल यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्यानंतर प्रशांत भूषण आणि ते आम आदमी पार्टीतून बाहेर पडले.
 
दरम्यान दिल्ली एमसीडी निवडणुकांमध्ये अरविंद केजरीवाल यांच्यासह आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रात घोळ झाल्याचा मुद्दा उपस्थित केला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अरुण गवळीची संचित रजेवर बाहेर येणार