Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

भाजप माझ्यासाठी सावत्र आईसारखी होती-नवज्योत सिंग सिद्धू

BJP was like a stepmother to me - Navjot Singh Sidhu भाजप माझ्यासाठी सावत्र आईसारखी होती-नवज्योत सिंग सिद्धू Marathi National News  In Webdunia Marathi
, शुक्रवार, 12 नोव्हेंबर 2021 (08:23 IST)
भारतीय जनता पक्ष माझ्यासाठी सावत्र आईसारखा होता. पण आता मी कौसल्येकडे आलो आहे, असं वक्तव्य पंजाब काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांनी केलं आहे.
 
पंजाब विधानसभेच्या कामकाजादरम्यान गुरुवारी जोरदार गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं.
यादरम्यान अकाली दल आणि काँग्रेस नेत्यांमध्ये खडाजंगी झाली. यामध्ये अकाली दलाचे नेते बिक्रम सिंह मजिठिय़ा आणि नवज्योत सिंग सिद्धू यांच्यात वाद झाला. यादरम्यान मजिठिया यांना उत्तर देताना सिद्धू यांनी वरील वक्तव्य केलं.
 
नवज्योत सिंग सिद्धू हे पूर्वी भाजपमध्ये होते. त्यांनी 2017 मध्ये भाजपचा त्याग करून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कंगनाला दिलेला पद्मश्री पुरस्कार परत घ्या; राष्ट्रवादी युवक काँग्रेसची मागणी