Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

समुद्रात संपले नावेचे इंधन, भारतीय तटरक्षक दलाने वाचवले 26 लोकांचे प्राण

Boat
, सोमवार, 20 मे 2024 (14:04 IST)
गोव्यातील मडगांव बंदराजवळ एक पर्यटक नाव अडकून गेली. बदलत्या वातावरणामुळे समुद्रात नावाचे इंधन संपून गेले. यामुळे समुद्रात 24 पर्यटकांसोबत चालक दल अडकून पडलेत. याची सूचना भारतीय तटरक्षक दलाला मिळताच हे दल समुद्राच्या दिशेने रवाना झाले. व वेळीच सर्वांना वाचवण्यात यश आले. 
 
तटरक्षक दलाचे प्रवक्ता यांनी सांगितले की, 'नेरुल पॅराडाईज' नाव तीन मीटर पेक्षा जास्त उंच उडणार्या लाटांमध्ये फसून गेली. व याच दरम्यान नावेमधील इंधन संपले. तर गस्त घालून परतणाऱ्या तटरक्षक  जहाज सी-148 मधील कर्मचाऱ्यांना हे यात्री फसल्याचे संकेत मिळाले. त्यानंतर त्यांनी लगेच कारवाई केली. 
 
समुद्री लाटांचा सामना करीत आईसीजी जहाज संकटग्रस्त नावेपर्यंत पोहचले. तटरक्षक दलाने या सर्व पर्यटकांना शांत केले व त्यांना सुरक्षित किनाऱ्यावर आणले. व चालक सहित सर्व पर्यटकांना चिकित्सा सहायता देऊन पणजीकडे रवाना केले. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नाइट्रोजन पान खाल्ल्याने 12 वर्षाच्या मुलीच्या पोटात झाले छिद्र