मुंबई उच्च न्यायालयाने शीना बोरा हत्याकांडातील प्रमुख संशयित आरोपी इंद्राणी मुखर्जीने परदेश कामा निमित्त जाण्याची परवानगी न्यायालयाकडे मागितली होती.
मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी इंद्राणी मुखर्जीला परदेशातील कामाची माहिती देण्याचे तोंडी निर्देश दिले.
न्यायमूर्ती एस.सी. चांडक यांच्या खंडपीठाने सीबीआयचे वकील श्रीराम शिरसाट यांना स्पष्टीकरण देण्यास सांगितले. मुखर्जी भारतात राहिल्यावर त्यांना देशात समन्वय साधून कामे पूर्ण करण्यासाठी काही मदत करणार काय ?
मुखर्जी यांनी परदेशात जाण्यासाठी याचिका दाखल केली होती. त्याच्या विरोधात सीबीआयने दाखल केलेल्या याचिकावर दोन आठवड्यांनी सुनावणी होणार आहे. इंद्राणी मुखर्जींना 10 दिवसांसाठी मालमत्ता आणि बँक खात्याशी संबंधित कामांना पूर्ण करण्यासाठी युरोपला जाण्याची परवानगी द्यावी अशी याचिका न्यायालयात दाखल केली आहे.
विशेष न्यायालयाच्या आदेशानुसार, इंद्राणी मुखर्जी कोर्टात रोख सुरक्षा म्हणून 2 लाख रुपये जमा केल्यावर पुढील तीन महिन्यांत न्यायालयाच्या सुनावणीच्या दोन तारखांमधील 10 दिवसांचा प्रवास करू शकतात. तसेच त्यांच्या दोन जवळच्या नातेवाईकांची माहिती सीबीआयला द्यावी लागणार आहे.