Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

प्रिंसिपल कडून 6 वर्षाच्या मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न करत निर्घृण खून

Webdunia
शुक्रवार, 27 सप्टेंबर 2024 (16:20 IST)
देशात सध्या महिलांवर आणि मुलींवर अत्याचाराच्या प्रकरणात लक्षणीय वाढ झाली आहे. गुजरातच्या दाहोद मध्ये एका सरकारी शाळेतून लज्जास्पद घटना समोर आली आहे. शाळेच्या प्रिंसिपलने एका 6 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला असून त्यात अपयशी झाल्यामुळे मुलीचा गळा आवळून निर्घृण खून केला. आरोपी प्रिन्सिपलला पोलिसांनी अटक केली आहे. 
 
सदर घटना गुजरातच्या दाहोदच्या एका सरकारी शाळेतील प्रिंसिपल गावातून जात होते. मयत मुलीच्या कुटुंबियांशी त्यांची चांगलीच ओळख होती. मुलीच्या कुटुंबीयांनी त्यांना मुलीला शाळेत सोडण्याची विनंती केली. प्रिन्सिपलने मुलीला गाडीत बसविले आणि थोड्याच अंतरावर जाऊन तिच्यावर अति प्रसंग करण्याचा प्रयत्न केला. तिने आरडाओरड केल्यावर आरोपीने तिचा गळा आवळून खून केला.

बराच वेळ झाल्यावर मुलगी घरी परतली नाही. कुटुंबीयांनी तिचा शोध घेण्यास सुरु केले. मुलगी शाळेच्या इमारतीच्या पाठीमागे अंगणात बेशुद्ध आढळली. तिला तातडीनं रुग्णालयात नेले असता तिला डॉक्टरांनी मयत घोषित केले. हे ऐकून आई वडिलांच्या पायाखालची जमीन सरकली. 

पोलिसांनी प्रिंसिपलची चौकशी केल्यावर मला काहीच माहित नाही असे सांगितले. मात्र मुलीला शेवटी तेच भेटल्याचे समोर आल्यावर पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी आरोपीची कसून चौकशी केल्यावर प्रिंसिपलने मुलीचा गळा आवळून खून केल्याचे कबूल केले.

प्रिंसिपलने सांगितले 19 सेप्टेंबर रोजी सकाळी शाळेत जाताना त्यांनी मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला मात्र मुलीने आरडाओरड केल्यामुळे घाबरून त्यांनी मुलीचा गळा आणि नाक दाबून ठेवला. नंतर तिचा मृत्यू झाल्यावर मृतदेह अनेक तास शाळेच्या आवारात उभ्या असलेल्या कार मध्ये ठेवला. नंतर शाळा सुटल्यावर मुलीचा मृतदेह बाहेर काढत इमारतीच्या मागे अंगणात फेकून दिला. पोलिसांनी या प्रकरणात आरोपी प्रिंसिपलला अटक केली आहे.   
Edited by - Priya Dixit  
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

गुरुचरित्र विषयी महत्त्वाची माहिती

Vat Savitri Vrat 2025 वट सावित्री व्रत कधी आहे, जाणून घ्या पूजा मुहूर्त आणि विधी

आरोग्यवर्धक सीताफळची पाने रक्ताची कमतरता दूर करून हाडे मजबूत करते

शुक्राणूंची संख्या वाढवण्यासाठी कोणती डाळ खाणे सर्वात योग्य ठरेल?

Things to Avoid in Kitchen तुमच्या स्वयंपाकघरात या वस्तू तर नाही? असतील तर लगेच बाहेर काढा

पुढील लेख
Show comments