Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बीएसएफने पकडल्या 4 पाक नौका

BSF 4 pakistani boats
अहमदाबाद- सीमा सुरक्षा दलाने गेल्या दोन दिवसात गस्तीदरम्यान गुजरातच्या कोटेश्वर आणि सर क्रिक परिसरात चार पाकिस्तानी नौका पकडल्या आहेत. यानंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.
 
मुंबईवरील 26 नोव्हेंबर 2008 च्या हल्ल्यावेळी दहशतवाद्यांनी भारतीय सीमेत घुसण्यासाठी अशा नौकांचा वापर केला होता. सर क्रिकच्या दलदलीच्या परिसरात मासेमारीसाठी वापरण्यात येणारी पाकिस्तानी नौका कोटेश्वर येथे बुधवारी बीएसएफच्या अधिकार्‍यांना आढळून आली होती. तर गुरुवारी सर क्रिक येथे भारतीय सीमेच्या 3 किलोमीटर आत 3 नौका बीएसएफने जप्त केल्या होत्या.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मुंबईतील भाजपचा जागा वाटपाचा तिढा सुटला