अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आर्थिक वर्ष 2021-22 साठीचा अर्थसंकल्प सादर केला. कोरोना संकटाच्या वेळी सरकारने बजेटमध्ये आरोग्य क्षेत्रावर बरेच लक्ष केंद्रित केले. आरोग्य खर्च 137 टक्क्यांनी वाढून 2.23 लाख कोटींपेक्षा जास्त झाला आहे. कोरोना लसीसाठी 35,000 कोटी रुपयांचे बजेट जाहीर केले आहे. सरकारच्या अर्थसंकल्प आणि अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या घोषणांबाबत टीका सुरू झाली आहे. काँग्रेस नेते शशी थरूर यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.