Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बुराडी सामूहिक आत्महत्या, आणखीन एक नवीन खुलासा

Webdunia
बुधवार, 11 जुलै 2018 (16:42 IST)
बुराडी सामूहिक आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी केलेल्या तपासात ललितचा मोठा भाऊ भुवनेश याला आत्महत्या करायची नव्हती, अशी बाब समोर आली आहे. घटनास्थळावर भुवनेशचा मृतदेह ज्याप्रकारे लटकलेला होता त्यावरून तो आत्महत्या करण्यास तयार नव्हता, असे पोलिसांचे म्हणणे आहे. भुवनेशचा एक हात गळ्याभोवती आवळलेल्या फासावर होता. यावरून तो मरण्यास तयार नव्हता व फास सोडवण्याचा प्रयत्न करत होता, असे स्पष्ट होत असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
 
पोलिसांच्या हाती लागलेल्या सीसीटीव्ही फुटेजनुसार ३० जून रोजी ज्या दिवशी भाटिया कुटुंबातील ११ जणांनी सामूहिक आत्महत्या केली त्या दिवशी भुवनेश नेहमीप्रमाणेच ठरलेली कामे करत असल्याचे दिसत आहे. त्या दिवशाही तो सकाळी ६ वाजता उठला आणि त्यानंतर दुकानात गेला. त्याचे वागणे बोलणे सामान्य होते. तो कुठेही अस्वस्थ असल्याचे दिसले नाही. याउलट त्या दिवशी ललित मात्र दिवसभर अस्वस्थ होता, असे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
 
सामान्यतः ज्यावेळी एखादी व्यक्ती आयुष्य संपवण्याचा निर्णय घेते, तेव्हा ती अस्वस्थ असते. पण भुवनेशच्या बाबतीत असे कुठेही आढळले नाही. तसेच ज्याप्रमाणे आत्महत्या करण्यासाठी कुटुंबातील इतर लोक स्टूल, दोरी आणि तारेची जमवाजमव करत होते, तसे भुवनेश करताना दिसला नाही. यामुळे त्याला घरात सुरू असलेल्या या ‘मोक्षप्राप्ती’बाबत त्याला संध्याकाळपर्यंत माहीत नसावे, असा अंदाजही पोलिसांनी व्यक्त केला आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशीफल 16 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर 2024

14 सप्टेंबरपासून बुध नक्षत्र परिवर्तन, 3 राशींसाठी हा आठवडा चांगला राहणार

18 सप्टेंबरला शुक्र गोचरमुळे मालव्य योग, 3 राशींना मिळेल छप्‍पर फाड धन

जिवंत व्यक्ती स्वतःच श्राद्ध करू शकते का? माणसाने जिवंत असताना त्याचे श्राद्ध कधी करावे?

अनंत चतुर्दशी 2024: गणेश विसर्जनाची वेळ आणि योग्य पद्धत

पुढील लेख
Show comments