उमेदवार त्यांच्या निकाल बोर्डाची अधिकृत वेबसाइट cbse.nic.in आणि cbseresults.nic.in तपासू शकतात. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी ट्विट करून निकाल जाहीर केला आहे.
यावेळी सीबीएसईच्या १२ वीसाठी १२ लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती.
बातमीनुसार टॉपर्सची यादी यावेळी जाहीर केली जाणार नाही.
यावेळी सीबीएसई दहावीच्या जवळपास 18 लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती, तर सुमारे 12 लाख विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती.
यावेळी निकाल 88.78 टक्के लागला जो सन 2019 (83.40) च्या तुलनेत जास्त आहे. रीजनवाईझ निकालात त्रिवेंद्रमने उत्कृष्ट कामगिरी केली.
येथील विद्यार्थ्यांचा एकूण निकाल 97.6.6 लागला. बेंगळुरू आणि चेन्नई अनुक्रमे दुसर्या आणि तिसर्या क्रमांकावर आहेत. परीक्षा 15 ते 29 फेब्रुवारी या कालावधीत ही घेण्यात आली होती.