Marathi Biodata Maker

सीबीएसई १२वीचा निकाल जाहीर, ८५.२०% विद्यार्थी उत्तीर्ण, मुलींनी पुन्हा बाजी मारली

वेबदुनिया न्यूज टीम
बुधवार, 13 मे 2026 (14:08 IST)
सीबीएसई बोर्डाचा १२वीचा निकाल जाहीर झाला आहे. बऱ्याच काळापासून निकालाची वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना आज दिलासा मिळाला आहे. यावर्षी ८५.२०% म्हणजेच १५ लाख विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यावेळी मुलींनी पुन्हा बाजी मारली आहे. विद्यार्थी cbse.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन आपला निकाल पाहू शकतात.

सीबीएसई बोर्डाने २०२६ सालचा इयत्ता १२वीचा निकाल जाहीर केला आहे. यावर्षी सीबीएसई इयत्ता १२वीच्या निकालातील उत्तीर्णतेची टक्केवारी घसरली आहे. गेल्या वर्षीच्या ८८.३९ टक्क्यांच्या तुलनेत, यावर्षी एकूण ८५.२० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. यावर्षी बोर्डाच्या परीक्षांमध्ये १८.५ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी भाग घेतल्याने एक नवीन इतिहास घडला आहे. विद्यार्थ्यांच्या या मोठ्या संख्येमुळे मूल्यांकन प्रक्रियेला विलंब झाला. बोर्डाने स्पष्ट केले आहे की, या डिजिटल प्रक्रियेमुळे निकालांमध्ये पारदर्शकता आली आहे. आता महाविद्यालयीन प्रवेशाची स्पर्धा सुरू होणार असल्याने विद्यार्थी आणि त्यांचे पालक भविष्याबद्दल उत्सुक आहे.

Edited By- Dhanashri Naik

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Hanuman Chalisa Path Benefits हनुमान चालीसा पठणाचे फायदे: मानसिक शक्ती दुप्पट कशी वाढते?

बुध ग्रहाची वक्री चाल सुरू! २९ जूनपासून 'या' राशींचे भाग्य उजळणार, तर कोणाला राहावे लागेल सावध?

Belly fat yoga: पोटावरील चरबी कमी करण्यासाठी 5 उत्तम योगासने, यापैकी कोणतेही एक करून पहा

खूप थंड पाणी पिणे चांगले की वाईट? सत्य जाणून घ्या

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये १५०० प्रोबेशनरी ऑफिसर (पीओ) पदां साठी भरती सुरु

पुढील लेख
Show comments