Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

म्हणून राज्यांना जातिनिहाय जनगणनेची माहिती देता येणार

म्हणून राज्यांना जातिनिहाय जनगणनेची माहिती देता येणार
, मंगळवार, 20 जुलै 2021 (23:35 IST)
ओबीसी राजकीय आरक्षणासाठी महाराष्ट्र सरकारने ओबीसींचे जातीनिहाय जनगणनेचा डेटाची मागणी करण्यात आली आहे. ओबीसी राजकीय आरक्षणासाठी हा डेटा न्यायालयात सादर करायचा आहे. परंतु केंद्र सरकारने २०११ च्या जनगणनेमध्ये जातीनिहाय गणना करण्याची कोणतीही योजना नाही अशी भूमिका मांडली आहे. याबाबत केंद्र सरकारने संसदेत एससी आणि एसटी प्रवर्ग वगळता इतर कोणत्याही प्रवर्गाची स्वतंत्र जनगणना न करण्याचे धोरण असल्याची माहिती दिली आहे. यामुळे राज्यांना जातिनिहाय जनगणनेची माहिती देता येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
 
केंद्र सरकारकडे महाराष्ट्र आणि ओडिशा या राज्यातील सरकारने जातीनिहाय जनगणनेचा डेटाची मागणी केली आहे. यावर गृहमंत्रालयाने संसदेत सांगितले आहे की, अनुसूचित जाती (एससी) आणि अनुसूचित जमाती (एसटी) या प्रवर्गांना सोडल्यास इतक कोणत्याही प्रवर्गाची स्वतंत्र जनगणना करणे केंद्र सरकारच्या धोरणात नाही. एसी आणि एसटी वगळता कोणत्याही प्रवर्गाची जातीनिहाय गणना न करणे हेच केंद्र सरकारचे धोरण आहे. असे गृहमंत्रालयाने स्पष्ट केलं आहे.
 
महाराष्ट्र सरकार आणि ओडीशा सरकारने आगामी जनगणना जातीनिहाय करुन डेटा राज्य सरकारला देण्यात यावा अशी मागणी केली आहे. यावर केंद्र सरकारने आपले धोरण जातीनिहाय नसल्याचे सांगत राज्य सरकारला विरोध केला आहे. केंद्र सरकारच्या भूमिकेमुळे राज्य सरकारला ओबीसी आरक्षणासाठी इम्पेरिकल डेटा गोळा करण्यास भाग पडणार आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

चीनमधल्या मुली सुंदर दिसण्यासाठी 'हा' धोका का पत्करत आहेत?