Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

लैंगिक छळ रोखण्यासाठी ‘शी-बॉक्स’ नवे संकेतस्थळ

Webdunia
बुधवार, 26 जुलै 2017 (09:11 IST)
नोकरीच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळाला चाप बसावा यासाठी केंद्रीय महिला व बालविकास मंत्रालयाने ‘शी-बॉक्स’ हे नवे संकेतस्थळ तयार करण्यात आले आहे. या संकेतस्थळावरुन महिलांना थेट तक्रार करता येणार आहे. केंद्र सरकारच्या नोकरीत असलेल्या महिलांचा लैंगिक छळ होत असल्यास त्यांना या संकेतस्थळाच्या माध्यमातून तक्रार करता येणार आहेत. तसेच नोकरीच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ होण्याचे प्रमाणही तपासणार असल्याचे महिला व बालविकास मंत्री मनेका गांधी यांनी सांगितले.

या संकेतस्थळाची सुरुवात सध्या केंद्रीय कर्मचारी महिलांसाठी सुरु झाली असली तरी लवकरच याचा विस्तार करण्यात येईल आणि खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांसाठी देखील ही सेवा सुरु केली जाणार आहेत, असे मनेका गांधी म्हणाल्या. नोकरीत महिलांचे लैंगिक शोषण होत असल्याच्या अनेक तक्रारी समोर येत होत्या. त्याला चाप बसावा यासाठी हे संकेतस्थळ सुरु करण्यात आले आहे. केंद्र सरकारमध्ये सध्या 3.37 लाख महिला कर्मचारी आहेत. त्यांच्यासाठी ही वेबसाईट नक्कीच फायदेशीर ठरणार आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

मतदार ओळखपत्र असं काढतात, त्यासाठी ऑनलाईन अर्ज असा करा

नीता अंबानींचा लेकीसोबत घर मोरे परदेसिया' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल!

गोड पदार्थ सारखे सारखे का खावे वाटतात? त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी करा या 10 गोष्टी

RBI guidelines change क्रेडिट कार्ड जारी करण्याच्या नियमांमध्ये कोणते बदल? जाणून घ्या

आता आधार कार्ड या तारखे पूर्वी अपडेट करा

पुढील लेख