भारताचा महत्वकांशी प्रकल्प असणारे चांद्रयान-२ येत्या १५ जुलै रोजी रात्री २ वाजून ५१ मिनिटांनी आंध्र प्रदेशमधल्या श्रीहरीकोटामधून येथून प्रक्षेपण होणार आहे. हे लॉचिंग सर्वसामन्यांना श्रीहरीकोटा येथून प्रत्यक्षात पाहण्याची संधी मिळणार आहे. यासाठी ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करावी लागणार आहे. ही नोस=नोंदणी आज रात्री १२ वाजल्यापासून म्हणजेच ४ जून सुरु होताच सुरु होणार आहे. विशेष म्हणजे यासाठी इस्त्रोकडून कोणत्याही पद्धतीचं शुल्क किंवा तिकीट आकारण्यात येणार नाही. इस्त्रोच्या ट्विटवर हॅण्डलवरुन यासंदर्भात ट्विट करण्यात आले आहे.
याआधी इस्त्रोचे लॉचिंग पाहण्यासाठी नागरिकांना त्यांचे इमेल आयडी इस्त्रोकडे पाठवायला लागायचे. हे इमेल आयडी व्हेरिफाय झाल्यानंतरच लॉचिंग लाइव्ह पाहता येत होते. हे लॉचिंग पाहायला जाण्यासाठी नोंदणी करताना नाव, संस्थेचे नाव, किती जणांचा ग्रुप आहे, लॉचिंग पॅडजवळ कसे पोहचणार, कोणत्या गाडीने येणार तिचा नंबर अशी माहिती द्यावी लागणार आहे. या साईटवर मोबाइल क्रमांकही द्यावा लागणार आहे. त्या माध्यमातून व्हेरिफिकेश झाल्यानंतर अटी आणि नियम मान्य केल्यावर नोंदणीची प्रक्रिया पूर्ण होईल.