Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

महंत भास्कर दास यांचे निधन, दावा केला होता रामजन्मभूमीवर

Webdunia
शनिवार, 16 सप्टेंबर 2017 (16:30 IST)

निर्मोही आखाड्याचे संत आणि रामजन्मभूमी वादातील सर्वात जुने पक्षकार महंत भास्कर दास  (८८)यांचे शनिवारी निधन झाले.  मागील अनेक दिवसांपासून ते आजारी होते. शनिवारी त्यांची प्रकृती आणखी खालावली. गेल्या चार दिवसांपासून महंत भास्कर दास यांच्यावर फैजाबाद हर्षण हार्ट संस्थेमध्ये उपचार सुरू होते.

महंत भास्कर दास यांनी १९५९ मध्ये अयोध्येतील रामजन्मभूमीवर दावा सांगणारी याचिका दाखल केली होती. त्याचमुळे या प्रकरणातले ते सर्वात जुने पक्षकार होते. मुस्लिम पक्षकार हाशिम अन्सारी यांच्यासोबत भास्कर दास यांचे चांगले संबंध होते. रामजन्मभूमी आणि बाबरीचा वाद असूनही या दोघांमधील स्नेह कायम होता. काही दिवसांपूर्वीच हाशिम अन्सारी यांचही निधन झालं आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मतदार ओळखपत्र असं काढतात, त्यासाठी ऑनलाईन अर्ज असा करा

नीता अंबानींचा लेकीसोबत घर मोरे परदेसिया' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल!

गोड पदार्थ सारखे सारखे का खावे वाटतात? त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी करा या 10 गोष्टी

RBI guidelines change क्रेडिट कार्ड जारी करण्याच्या नियमांमध्ये कोणते बदल? जाणून घ्या

आता आधार कार्ड या तारखे पूर्वी अपडेट करा

पुढील लेख
Show comments