Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

गाडी चालकाने चिन्मयी सुमीत यांच्यासमोर केले हस्तमैथून

Webdunia
सोमवार, 19 फेब्रुवारी 2018 (16:55 IST)
मुंबईत एका बीएमडब्ल्यू गाडीच्या चालकाने चिन्मयी यांच्यासमोर हस्तमैथून करायला सुरूवात केली. पार्ले टिळक शाळेजवळ ही गाडी उभी होती. चिन्मयी यांनी या विकृत प्रकाराबद्दल त्या व्यक्तिला हटकलेही. त्या मारण्यासाठी त्याला पुढे सरसावल्या असता त्या अज्ञात व्यक्तिने तिथून पळ काढला. या सगळ्या प्रकारात चिन्मयी यांना त्या गाडीचे शेवटचे १९८५ हे ४ नंबरच टिपता आले. त्या चालकाने त्याने राखाडी रंगाचा सफारी घातला होता. 
 
चिन्मयी यांचे पती अभिनेते सुमीत राघवन यांनी घडलेली संपूर्ण घटना ट्विटरवर शेअर केली शिवाय मुंबई पोलिसांकडे मदतीची मागणीही केली. यासंदर्भात चिन्मयी यांनी पोलिसांकडे रितसर तक्रारही केली. सुमित यांनी मुंबई पोलिसांना ट्विटमध्ये टॅग करत संपूर्ण प्रकार कथन करत या चालकाला लवकरात लवकर पकडणे गरजेचे असल्याचे म्हटले. सुधांशु पांडेच्या ट्विटला उत्तर देताना, ‘तेथे शालेय विद्यार्थिनीदेखील होत्या. त्यामुळे या इसमाने हा विकृत प्रकार त्यांच्यासमोरदेखील केला असा असावा,’ असा संशय सुमीत यांनी व्यक्त केला. सुमीतच्या या पोस्टनंतर पोलिसांनी या संदर्भात तपास सुरू केला. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पितृ पक्ष 2024: पितृपक्षात श्राद्ध, तर्पण किंवा पिंडदान करण्यासाठी लागणारे साहित्य आणि पूजा विधी जाणून घ्या

पितृपक्षात मृत नातेवाईक स्वप्नांच्या माध्यमातून संदेश देतात, अशी स्वप्ने पडली तर दुर्लक्ष करू नका

लाल रंग सकारात्मक की नकारात्मक? आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व जाणून घ्या

अविवाहित आणि आकस्मिक मृत्यू झालेल्या पूर्वजांसाठी तर्पणचे नियम जाणून घ्या

Vastu Tips: तुमचे भाग्य बदलू शकतात वास्तुशास्त्राचे हे 5 उपाय

पुढील लेख