तामिळनाडू सरकारने मंत्रिमंडळात मोठे फेरबदल केले आहेत. मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी त्यांचा मुलगा उदयनिधी स्टॅलिन यांना उपमुख्यमंत्री बनवले आहे. यासोबतच सेंथिल बालाजी यांचा पुन्हा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे.
अनेक दिवसांपासून उदयनिधी स्टॅलिन यांना उपमुख्यमंत्री करण्यात आल्याच्या बातम्या येत होत्या. सीएम एमके स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन यांची उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती झाल्याची माहिती राजभवनच्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे मिळाली.
तामिळनाडू सरकारच्या नवीन मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा रविवार, 29सप्टेंबर रोजी दुपारी 3.30 वाजता राजभवन, चेन्नई येथे होणार आहे.
स्टॅलिन सरकारने मंत्रिमंडळात एकूण सहा बदल केले आहेत.सेंथिल बालाजी पुन्हा तामिळनाडू सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री होणार आहे. उदयनिधी स्टॅलिन सनातन धर्माविरोधात भाष्य करून चर्चेत आले होते.