नवी दिल्ली : काँग्रेसचे यूट्यूब चॅनल अचानक डिलीट करण्यात आले आहे. पक्षाने याबाबत माहिती दिली आहे. काँग्रेसने यूट्यूब आणि गुगल या दोन्हींशी संपर्क साधून चॅनल का हटवण्यात आलं हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. काँग्रेस पक्ष पुन्हा यूट्यूब चॅनल पूर्ववत करण्याचा प्रयत्न करत आहे.
काँग्रेसने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आमचे यूट्यूब चॅनल 'इंडियन नॅशनल काँग्रेस' हटवण्यात आले आहे. आम्ही याचे निराकरण करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि टीम या संदर्भात यूट्यूब आणि गुगलशी बोलणी करत आहे. हा तांत्रिक बिघाड आहे की काही षडयंत्र आहे, याचा तपास सुरू आहे. आम्ही परत येऊ अशी आशा आहे.
'भारत जोडो यात्रे'पूर्वी यूट्यूब चॅनल डिलीट
याआधी देशातील अनेक बड्या नेत्यांचे सोशल मीडिया अकाउंट हॅक झाले आहेत, मात्र कोणत्याही पक्षाचे यूट्यूब चॅनल डिलीट करण्याची ही पहिलीच वेळ आहे. सध्या यामागचे कारण स्पष्ट झाले नसून तपास सुरू आहे. हॅकिंगचा संशय व्यक्त केला जात असला तरी त्याबाबत कोणतीही ठोस माहिती नाही.
काँग्रेसचे यूट्यूब चॅनल अशावेळी हटवण्यात आले आहे जेव्हा पक्ष देशभरात भारत जोडो यात्रा सुरू करणार आहे. 7 सप्टेंबरपासून कन्याकुमारी येथून या मोहिमेची सुरुवात होणार असून 12 राज्यांमधून जात जम्मू-काश्मीरमध्ये ही यात्रा संपणार आहे. पक्षाचे नेतृत्व केलेसंसद सदस्यराहुल गांधी करणार आहेत.