कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी मास्क घालण्याची आवश्यकता नाही असं धक्कादायक विधान आसामचे आरोग्य मंत्री हेमंता बिस्वा सरमा यांनी केलं आहे.
"केंद्र सरकारने कोरोना नियमावली जाहीर केली आहे. परंतु आसामचा विचार करता, इथे कोरोनाचा धोका नाही. त्यामुळे इथे भीती पसरवण्याचं कारण नाही असं सरमा म्हणाले,"
"मास्क घालण्याची वेळ येईल तेव्हा मी लोकांना सांगेन. सध्या अर्थव्यवस्था बळकट करण्यावर लक्ष केंद्रित करायचं आहे. मास्क घातले तर ब्युटी पार्लर कसे चालतील. त्यांचंही काम सुरू राहायला हवं," असं सरमा म्हणाले.
देशातल्या अनेक राज्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण आहे. आसाममध्ये तशी परिस्थिती नाही. मात्र तिथेही कोरोनाचे रुग्ण काही प्रमाणात वाढू लागले आहेत.