Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

फाईव्ह स्टार हॉटेलमधला प्रकार, महिला कर्मचाऱ्याची साडी खेचली

crime in delhi
, शुक्रवार, 18 ऑगस्ट 2017 (17:34 IST)

दिल्लीमध्ये फाईव्ह स्टार हॉटेलच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने महिला कर्मचाऱ्याची साडी खेचून तिला जवळ ओढण्याचा प्रयत्न केला आहे. हा प्रकार सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाला आहे. विशेष म्हणजे ज्या अधिकाऱ्याने हे कृत्य केले त्याच्यावर कारवाई करण्याऐवजी पीडित महिलेने तक्रार केली म्हणून तिलाच नोकरीवरुन काढून टाकण्यात आले. 

ही घटना 29 जुलैला दिल्लीच्या प्राईड प्लाजा हॉटेलमध्ये घडली. 33 वर्षीय पीडित महिला मागच्या दोनवर्षांपासून हॉटेलच्या गेस्ट रिलेशन सेक्शनमध्ये नोकरी करत होती. हॉटेलचा सुरक्षा व्यवस्थापक पवन दहीया मागच्या अनेक दिवसांपासून या महिलेवर शरीरसंबंध ठेवण्यासाठी दबाव टाकत होता. 29 जुलैला त्याने पीडित महिलेला त्याच्या रुममध्ये बोलवले तिथे त्याने साडी खेचून महिलेला जवळ ओढण्याचा प्रयत्न केला. त्याच दरम्यान पवनच्या रुममध्ये एक व्यक्ती आली हीच संधी साधून पीडित महिला तिथून बाहेर पडली. 


Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

दोघांकडून महिला पत्रकाराचा पाठलाग, पोलिसांनी केली अटक