Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

खासदार चिंतामण वनगा यांचे निधन

खासदार चिंतामण वनगा यांचे निधन
, मंगळवार, 30 जानेवारी 2018 (14:54 IST)
पालघर जिल्ह्यातील भाजप खासदार चिंतामण वनगा यांचे (६७) यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. दिल्लीच्या राममोहन लोहिया रुग्णालयात चिंतामण वनगा यांनी अखेरचा श्वास घेतला. चिंतामण वनगा यांच्या छातीत दुखत होतं. त्यानंतर त्यांना आर एम एलमध्ये दाखल करण्यात आलं. मंगळवारी  सकाळी साडे दहाच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

चिंतामण वनगा तीन वेळा खासदार म्हणून लोकसभेवर निवडून गेले होते. 1996 मध्ये ते पहिल्यांदा खासदार झाले. त्यानंतर 1999 मध्ये ते डहाणू मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. तर 2014 मध्ये पालघर मतदारसंघात बहुजन विकास आघाडीच्या बळीराम जाधव यांना पराभूत करुन खासदार झाले. व्यवसायाने वकील असलेले चिंतामण वनगा यांनी 1990 ते 1996 या काळात भाजपचे ठाणे अध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडली होती. तसंच ते महाराष्ट्रातील भाजप आदिवासी सेलचे प्रमुखही होते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

हार्दिक पांड्या आणि एली अवरामचं डेटिंग?