Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

घरगुती कारणावरून पत्नी आणि सासूचा गोळ्या घालून खून केला,आरोपीला अटक

delhi Murder Case :Murder of wife and mother-in-law for domestic reasons
, रविवार, 10 ऑक्टोबर 2021 (14:06 IST)
दिल्लीत घरजावई म्हणून राहणाऱ्या एका व्यक्तीला त्याच्या 21 वर्षीय पत्नी आणि सासूची गोळ्या घालून हत्या केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. घटनेनंतर त्याने स्वतः पोलिसांना फोन करून आपला गुन्हा कबूल केला.
 
पत्नी आणि सासूची हत्या केल्याच्या आरोपाखाली दिल्लीत एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. घटनेनंतर त्याने स्वतः पोलिसांना फोन करून आपला गुन्हा कबूल केला. आरोपीची ओळख महेश, दक्षिण-पश्चिम दिल्लीच्या बाबा हरिदास नगरमधील नारनुम पार्कमधील रहिवासी आहे.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी व्यक्ती आपल्या पत्नीसोबत बाबा हरिदास नगरमध्ये सासूच्या घरी घर जावई म्हणून राहत होता, यामुळे ते त्याला आयती भाकर तोडतो असे अनेकदा टोमणे मारत असायचे. रोजच्या टोमण्यांना कंटाळून त्याने पत्नी आणि सासूला गोळ्या घालून ठार मारले. गोळी लागल्याने दोघींचा जागीच मृत्यू झाला. मृत आरोपी पत्नीची ओळख निधी  (21) आणि सासू वीरो (55) अशी आहे.
 
पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, घटनेनंतर आरोपी व्यक्तीने स्वतः पोलिसांना फोन करून आपला गुन्हा कबूल केला. दुहेरी हत्याकांडाची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन शव विच्छेदनासाठी पाठवले.
 
हत्येत वापरलेले हत्यार आरोपींच्या ताब्यातून जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. या संदर्भात भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) कलम 302 (खून) अंतर्गत गुन्हा दाखल करून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. पोलीस सध्या आरोपीची कसून चौकशी करत आहेत. 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अफगाणिस्तान: तालिबानच दहशतवादी संघटनांना लगाम घालणार, अमेरिकेची मदत नाकारली