तिरुपती मंदिरातील लाडूंमध्ये प्राण्यांची चरबी सापडल्यानंतर राजकारण तापत आहे.आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. एवढेच नाही तर या पापाचे प्रायश्चित करण्यासाठी 11 दिवस उपवास करणार असल्याची घोषणा पवन कल्याण यांनी शनिवारी केली. यासाठी ते 22 सप्टेंबरपासून गुंटूर जिल्ह्यातील नंबूर येथील श्री दशावतार व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात 11 दिवसांचा उपवास करत प्रायश्चित दीक्षा घेणार.
त्यांनी सोशल मीडियावर लिहिले आहे. मी देवाकडून क्षमा मागण्यासाठी हे उपवास करत आहे.
प्रायश्चित्त दीक्षा संपल्यावर, 1 आणि 1 ऑक्टोबरला मी तिरुपतीला जाऊन देवाचे वैयक्तिक दर्शन घेईन आणि क्षमा मागेन आणि नंतर माझी प्रायश्चित्त दीक्षा देवासमोर पूर्ण होईल.
भगवान बालाजी! मला क्षमा करा तिरुमला येथे मिळणारा लाडवाचा प्रसाद काही राज्यकर्त्यांच्या अनियंत्रित प्रवृत्तीमुळे अपवित्र झाला. लाडूच्या प्रसादात प्राण्यांचे अवशेष मिळाल्याचे समजतात मी अस्वस्थ झालो. मी स्वतःला अपराधी समजतो.
यासाठी मी प्रायश्चित करण्यासाठी 11 दिवस प्रायश्चित दीक्षा घेत उपवास करण्याचा निर्णय घेतला आहे. 11 दिवसांनंतर मी तिरुमला श्री व्यंकटेश्वरांचे दर्शन घेईन.या साठी मला शक्ती द्या.