Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मुख्यमंत्र्यांना 'पुणेरी टोमणे', सोशल मीडियावर जोक्सचा पाऊस

devendra fadnavis
पुणे , शनिवार, 18 फेब्रुवारी 2017 (17:19 IST)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पुण्यातील सभा गर्दी अभावी रद्द करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा सदाशिव पेठेत टिळक रोडवर आयोजित केली होती. मात्र भर दुपारच्या सभेकडे पुणेकरांनी पाठ फिरवली.
 
मुख्यमंत्र्यांनी सभा रद्द झाल्याचं ट्विट केल्यानंतर, सोशल साईट्सवर विनोदांचा पाऊस सुरु झाला.
 
दुपारच्या वेळेत तेही सदाशिव पेठेत मुख्यमंत्र्यांनी सभा आयोजित करणं म्हणजे हात दाखवून अवलक्षण असल्याचे मेसेज पुण्यात फॉरवर्ड होऊ लागले.
 
सभेला कोणीच नाही, सभा सोडून मुख्यमंत्री रवाना!
 
पुणेकरांची  1 ते 4 ही वेळ झोपण्यासाठीच असते, त्या वेळेत सर्व व्यवहार बंद असतात, असे मेसेज यापूर्वीचेच आहेत. मात्र तरीही त्यावेळेत सभा आयोजित केल्याने, मुख्यमंत्र्यांना पुणेरी टोमण्यांना सामोरं जावं लागत आहे.
 
असेच काही सोशल मीडियावर फॉरवर्ड झालेले जोक -(हे सर्व जोक सोशल मीडियावरील आहेत)
 
अब की बार
 
कुणाचेही सरकार
 
इथे दुपारी झोपतो मतदार.
 
नवीन पुणेरी पाटी ????????????

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सोन्याच्या बदल्यात दोन लाखापर्यंत कर्ज