Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Dog Attack In Ghaziabad:पिटबुल बेकाबू, पार्कमध्ये खेळणाऱ्या मुलावर हल्ला, चेहऱ्याला 200 टाके पडले

Webdunia
शुक्रवार, 9 सप्टेंबर 2022 (13:36 IST)
Dog Attack In Ghaziabad:गाझियाबादमध्ये कुत्रा चावल्याच्याघटना समोर येत आहेतगुरूवारी शहरात कुत्रा चावण्याची सलग तिसरी घटना उघडकीस आली असून त्यात पिटबुल जातीच्या कुत्र्याने उद्यानात खेळणाऱ्या एका मुलाला चावा घेऊन गंभीर जखमी केले. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. जखमी मुलाला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्या चेहऱ्यावर 200 टाके पडले आहेत.
 
संजय नगर भागातील प्रकरण
गाझियाबादमध्ये पाळीव कुत्रे लोकांवर सातत्याने हल्ले करत आहेत. ताजे प्रकरण गाझियाबाद पोलिस स्टेशनच्या मधुबन बापुधाम भागातील सेक्टर 23 मधील संजय नगर भागातील आहे. येथे राहणाऱ्या पुष्प त्यागी नावाच्या 11 वर्षीय मुलावर पिटबुलर जातीच्या कुत्र्याने जीवघेणा हल्ला केला. बालक उद्यानात खेळत असताना ही घटना घडली. मुलाच्या चेहऱ्यावर सुमारे 200 टाके पडले असून मुलाला सध्या बोलता येत नाही. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या प्रकरणामुळे मुलाच्या कुटुंबीयांमध्ये संतापाचे वातावरण आहे. कुत्र्याने प्राणघातक हल्ला करण्याची ही पहिलीच घटना नाही. अलीकडच्या काळात अशा अनेक घटना समोर आल्या आहेत. काही दिवसांपूर्वी नोएडा आणि गाझियाबादच्या राजनगर एक्स्टेंशन परिसरात पाळीव कुत्र्याने प्राणघातक हल्ला केल्याची चर्चा होती.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशीफल 16 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर 2024

14 सप्टेंबरपासून बुध नक्षत्र परिवर्तन, 3 राशींसाठी हा आठवडा चांगला राहणार

18 सप्टेंबरला शुक्र गोचरमुळे मालव्य योग, 3 राशींना मिळेल छप्‍पर फाड धन

जिवंत व्यक्ती स्वतःच श्राद्ध करू शकते का? माणसाने जिवंत असताना त्याचे श्राद्ध कधी करावे?

अनंत चतुर्दशी 2024: गणेश विसर्जनाची वेळ आणि योग्य पद्धत

पुढील लेख
Show comments