Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

डॉ. प्रविण तोगडिया तोगडियांची प्रकृती स्थिर…

dr. pravin togdia
अहमदाबाद , बुधवार, 17 जानेवारी 2018 (09:07 IST)
विश्‍व हिंदु परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. प्रविण तोगडिया यांची प्रकृती आता स्थीर असल्याची माहिती त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्‍टरांनी दिली आहे. काल तोगडिया हे काही काळ बेपत्ता झाल्यानंतर बेशुद्धावस्थेत आढळून आले होते. त्यांच्यावर येथील एका दवाखान्यातच उपचार सुरू आहेत. वरीष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी आज रूग्णलयात जाऊन त्यांच्या प्रकृतीची माहिती घेतली.
 
त्यांच्यावर उपचार करणारे डॉ रूपकुमार आगवाल यांनी सांगितले की त्यांना 108 क्रमांकाच्या रूग्णवाहिका सेवा केंद्राच्या रूग्णवाहिकेतून काल रात्री बेशुद्धावस्थेत येथे आणले होते. तेथे त्यांच्यावर उपचार केल्यानंतर ते शुद्धीवर आले होते. दरम्यान आज त्यांच्या प्रकृतीची विचारपुस करण्यासाठी रूग्णालयात अनेक ज्येष्ठ नेत्यांची रीघ लागली होती.
 
पाटीदार अमानत आंदोलन समितीचे दिनेश बंभानिया यांनीही त्यांची भेट घेऊन विचारपुस केली. तोगडिया यांना राजस्तान पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा दावा विश्‍व हिंदु परिषदेने केला होता पण त्यांनी तो नंतर मागे घेतला. तोगडिया यांना एका जुन्या खून खटल्याच्या प्रकरणात ताब्यात घेण्यासाठी राजस्तानतील पोलिसांचे एक पथक अहमदाबादला आले होते पण तोगडिया त्यांना त्यांच्या निवासस्थानी सापडू शकले नव्हते. तोगडिया हे शहराच्या थलतेज भागात राहतात. विश्‍व हिंदु परिषदेच्या पलडी भागातील मुख्यालयात ते काल गेले होते तेथून ते रिक्षात बसून अज्ञात स्थळी निघून गेले होते. परतुं त्यांचा ठावठिकाणा बराच काळ लागू शकला नव्हता. नंतर ते बेशुद्धावस्थेत आढळले होते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

12.36 टक्‍क्‍यांनी निर्यात वाढली