Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बस चालवताना हार्ट अटॅक

Webdunia
एसटी बस चालवतानाच चालकाला हृदयविकाराचा झटका आल्याची घटना अहमदनगरच्या पारनेर बस स्थानकाबाहेर घडली आहे. अशोक भापकर असं या चालकाचं नाव आहे.
 
बस चालवताना हृदयविकाराच्या झटका आल्यानं ते स्टेअरींग व्हीलवरच पडले आणि बस अनियंत्रित झाली. मात्र प्रवासी आणि नागरिकांनी प्रसंगावधान दाखवल्यानं मोठी दुर्घटना टळली. सध्या बस चालका यांच्यावर उपचार सुरु आहेत. 
 
पारनेर बस स्थानकाबाहेर ही थरारक घटना घडली असून हा संपूर्ण प्रकार दुकानातील सीसीटीव्हीत कैद झाला आहे. यात दिसून येत आहे की पारनेर बस स्थानकातून ही बस बाहेर पडताच चालक भापकर यांना झटका आल्याने ते स्टेरिंग वर पडले आणि त्यांचे बस वरील नियंत्रण सुटले. मात्र बाजूलाच असलेल्या दुकानदारांनी प्रसंगावधान दाखवत बसकडे धाव घेत केबिन मध्ये चढून बस नियंत्रणात आणल्याने मोठा अनर्थ टळला. दरम्यान या भापकर यांना पारनेरमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Narad Jayanti: नारद जयंती मुहूर्त- पूजा विधी आणि जन्म कथा

Shani Jayanti 2025 : शनी जयंती कधी ? योग्य तारीख, शुभ वेळ, पूजा पद्धत आणि उपाय जाणून घ्या

काय आपण ही सूर्यास्तानंतर दह्याचे सेवन करता? तर नक्की वाचा

उन्हाळ्यात चिकट त्वचेपासून मुक्ती मिळविण्यासाठी हे उपाय मदत करतील

ग्रीन टीमध्ये साखर घालावी की नाही? जाणून घ्या

पुढील लेख
Show comments