Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मद्यधुंद चालकाने भरधाव गाडीने 9 जणांना चिरडले

Jaipur car accident
, मंगळवार, 8 एप्रिल 2025 (16:06 IST)
सोमवारी रात्री 9.30 च्या सुमारास जयपूर परकोटा येथील नाहरगड पोलिस स्टेशनसमोरून अर्धा किलोमीटर अंतरावर एका वेगवान कारने दोन लोकांना चिरडले. या अंतरादरम्यान, कारने धडक दिल्याने इतर 7 जण जखमी झाले. 
गाडी चालकाने समोरून येणाऱ्या प्रत्येकाला धडक दिली. गाडीने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या वाहनांना आणि अनेक दुचाकींनाही धडक दिली. यामुळे बाजारात गोंधळ निर्माण झाला. नंतर कार चालक गाडी तिथेच सोडून पसार झाला. या घटनेनंतर शेकडो लोक घटनास्थळी जमले आणि रस्त्यांवर वेगाने वाहने चालवल्याबद्दल संताप व्यक्त झाला. पोलिस गाडी पोलिस ठाण्यात आणत असताना, जमावाने गाडीची तोडफोड केली. जमाव हिंसक होत असल्याचे पाहून जवळच्या पोलिस ठाण्यांमधून पोलिस दल मागवण्यात आले.
ALSO READ: पंतप्रधान मोदींनी भारतातील पहिल्या उभ्या लिफ्ट समुद्री रेल्वे पुलाचे उद्घाटन केले
पोलिसांनी वाहन चालकाला अटक केली असून तो मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवत असल्याचे पोलिसांनी सांगितले. 
प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार, वाहन चालकाने सर्वप्रथम नाहरगड पोलीस ठाणे चौकात एका स्कूटर चालक आणि पादचाऱ्याला धडक दिली. नंतर गाडी संतोषीमाता मंदिराकडे वळवली तिथे एका दुचाकीला आणि पादचाऱ्याला धडक दिली.
ALSO READ: माथेफिरू प्रियकराने रस्त्यावर प्रेयसीवर चाकूने हल्ला केला
पुढे गेल्यावर त्याने एकाला धडक दिली. वाहन वेगाने धावत होते. वाहनाने दोघांना चिरडले रस्त्यावर रक्ताचा सडा होता. नंतर वाहन चालक पळून गेला.जयपूर हिट अँड रन प्रकरणात आतापर्यंत ३ जणांचा मृत्यू झाला आहे. आज सकाळी एक मृत्यू झाला. यापूर्वीही एका व्यक्तीचा कारने चिरडल्याने जागीच मृत्यू झाला होता. दुसऱ्या व्यक्तीला वाचवण्याचे प्रयत्न करण्यात आले पण नंतर रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला.
Edited By - Priya Dixit  
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

वर्धा : गाडीसमोर रानडुक्कर आल्याने अपघातात चार जणांचा मृत्यू