Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

Earthquake in Delhi-NCR:दिल्लीसह संपूर्ण एनसीआरमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के

earthquake
, रविवार, 15 ऑक्टोबर 2023 (17:41 IST)
Earthquake in Delhi-NCR:रविवारी दुपारी चारच्या सुमारास दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 3.1 इतकी मोजली गेली. हरियाणातील फरिदाबाद हे भूकंपाचे केंद्र होते. भूकंपाचे धक्के इतके जोरदार होते की लोक घाबरले आणि घराबाहेर पळाले. एनसीआरमधील फरिदाबाद, गाझियाबाद, नोएडा, ग्रेटर नोएडा आणि गुरुग्राममध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. 
 
भूकंपाची तीव्रता खूपच कमी असल्याचे मोजले गेल्याने दिलासा मिळाला. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता फक्त 3.1 होती. गेल्या दोन आठवड्यात दिल्ली एनसीआरची पृथ्वी हादरण्याची ही दुसरी वेळ आहे. याआधी 3 ऑक्टोबरला राजधानी दिल्ली आणि एनसीआरच्या अनेक भागात भूकंपाचे धक्के जाणवले होते. त्यावेळी झालेला भूकंप खूप तीव्र होता, त्यामुळे लोकांना घराबाहेर पडावे लागले.
 





Edited by - Priya Dixit   
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मनोज जरांगे सभा : पाटिलकीची उतरत चाललेली नशा आणि ‘20 रुपयांचं पेट्रोल’