Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सचिन जोशीला ED नं केली अटक, 100 कोटींचा गैरव्यवहार

ED arrests actor Sachin Joshi in Omkar Group money-laundering case
, सोमवार, 15 फेब्रुवारी 2021 (11:54 IST)
मुंबई- प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता सचिन जोशीला ईडीनं अटक केली आहे. सचिनवर 100 कोटींचा आर्थिक गैरव्यवहार केल्याचे आरोप आहेत.
 
सचिन हा गुटखा किंग म्हणून ओळखले जाणारे जगदीश जोशी यांचा मुलगा आहे. सचिन जोशी आणि ओमकार ग्रुप प्रमोटर्स यांनी तब्बल 100 कोटींचा गैरव्यवहार केला असून या प्रकरणी त्याची 18 तास चौकशी करण्यात आली. चौकशीत अपेक्षित माहिती समोर न अल्यामुळे अखेर त्याला अटक केली आहे.
 
सचिनला ईडीकडून समन्स बजावण्यात आलं होतं मात्र सचिन ईडी कार्यालयात हजर झाला नव्हता. नंतर त्याला चौकशीसाठी दक्षिण मुंबईतील कार्यालयात आणून 18 तास त्याची चौकशी केली गेली नंतर अटक करण्यात आली. ED ने याआधी ओमकार ग्रुपचे चेअरमन कमाल गुप्ता आणि व्यवस्थापकीय संचालक बाबूलाल वर्मा यांना मनी लॉण्डरिंग प्रकरणी अटक केली आहे. 
 

विजय मल्ल्याचा गोव्यामधील किंगफिशर व्हिला खरेदी केल्यामुळे सचिन व्यवसायिक म्हणून पहिल्यांदा प्रकाशझोतात आला होता. त्याचे देशभरात अनेक रेस्तराँ आणि क्लब आहेत. 


Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

केंद्रीय कर्मचार्‍यांना शासकीय आदेश, आता कामाच्या दिवसात कार्यालयात जावे लागेल, फक्त त्यांना सूट मिळेल…