1993 च्या स्फोटातील आरोपी इक्बाल मिर्चीची सहाशे कोटींची मालमत्ता अंमलबाजवणी संचालय (ED) ने जप्त केली आहे. यामध्ये त्याचे मुंबई आणि लोणावळामधले बंगले, फ्लॅट, कार्यालय जप्त करण्यात आले आहे. इक्बाल मिर्चीने अवैध पद्धतीने संपत्ती गोळा केल्याप्रकरणी सोमवारी आरोपपत्र दाखल केले होते.
सुमारे 1200 पानी आरोपपत्रात त्याची पत्नी आणि दोघा मुलांसह 12 जणांवर आरोप ठेवण्यात आले आहेत. इक्बाल मिर्चीचे लंडनमध्ये निधन झाले आहे.