Egg Tea Viral: सध्या खाण्याच्या प्रयोगाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. लोकांनी मॅगीचे काय केले नाही? कधी पाणीपुरी मध्ये मॅगी सर्व्ह केली जाते, तर कधी चॉकलेट मॅगी बनवतात. त्याचप्रमाणे आईस्क्रीमसोबतही अनेक खेळ झाले आहेत. आता एका महिलेने चहाचा असा प्रयोग केला आहे की, 'चहाप्रेमींना चहा प्यावासा वाटणार नाही!' खरं तर हा 'वेगळा चहा' बनवण्यासाठी महिलेने चहामध्ये दूध, पाने, साखर, मीठ, दालचिनी आणि वेलची मिसळली. यासोबत सफरचंद आणि अंडी देखील वापरली आहेत.
चहा साठी घातलेले इतर सर्व साहित्ये ठीक होते पण लोकांना चहामध्ये अंडी आणि सफरचंद घालणे अजिबात आवडले नाही. हा असा चहाचा व्हिडिओ पाहिल्यानंतर ते सामान्य चहा पिण्याआधी दोनदा नक्कीच विचार करतील
या विचित्र चहाचा व्हिडिओ बांगलादेशी फूड व्लॉगिंग अकाऊंट सुलतानाज कुकने 1 ऑक्टोबर रोजी फेसबुकवर पोस्ट केला होता. त्याने बंगाली भाषेत कॅप्शन लिहिले - उकळत्या चहामध्ये कच्चे अंडे. बघा पुढे काय झाले. हा चहा विकून तुम्ही रातोरात करोडपती होऊ शकता.
2.35 मिनिटांच्या या व्हिडिओमध्ये महिला 'फ्रूट एग टी' कसा बनवायचा हे शिकवत आहे. यासाठी ती प्रथम गॅसवर भांडे ठेवते आणि नंतर त्यात चहाची पाने, मीठ आणि साखर घालून मिक्स करते. यानंतर ती सफरचंदाचे तुकडे करून त्यात टाकते. सर्व गोष्टी व्यवस्थित एकत्र केल्यावर ती त्यात एक ग्लास दूध मिसळते. मिश्रणाला उकळी आल्यावर ती त्यात एक कच्चे अंडे फोडते. मग वेलची आणि दालचिनीचे तुकडे टाकून ती चहा उकळवते आणि नंतर चहा कपात ओतते, अंड्याने सजवते आणि सर्व्ह करते. आता या चहाची चव कशी असेल? याची आपण कल्पनाही करू इच्छित नाही!
या क्लिपला 11 हजार प्रतिक्रिया, 13 लाख व्ह्यूज मिळाल्या आहेत. जिथे अनेक यूजर्सनी लिहिले की तुम्ही चहा बनवला आहे, कृपया प्यायल्यानंतर दाखवा.चहाचा असा प्रयोग पाहून चहाप्रेमी चांगलेच संतापले आहेत.